- Our Kharif 2019 implementing footprint is now in GJ, MP and OD.
- RGICL is in its 7th Successful year of execution of PMFBY.
- Technological breakthrough needed for Effective Crop Insurance - CEO, PMFBY.
- Govt uses Artificial Intelligence to boost Farming.
- Our Kharif 2020 - Rabi 2020-21, Kharif 2021 - Rabi 2021-22, Kharif 2022 - Rabi 2022-23 implementing footprint are in Assam, Haryana, Madhya Pradesh, Maharashtra, Odisha, Rajasthan, Tamil Nadu, Andhra Pradesh, Jammu & Kashmir
- More than 15.83 million farmers application covered in Kharif 2020, 2021 & Rabi 2020-21
- अधिसूचित केलेल्या पिकांपैकी कोणतेही पीक घेण्यात अपयश आल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक मदत पुरविणे.
- शेतकऱ्यांची शेती अखंडपणे चालू रहावी म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य आणणे.
- शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन आणि आधुनिक पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहन देणे.
- कृषी क्षेत्राला पत पुरवठा करण्याची खातरजमा करणे.
- एकसमान हप्ता: विमा रकमेवर शेतकऱ्यांना सर्व खरीप पिकांसाठी जास्तीतजास्त २% आणि सर्व रब्बी पिकांसाठी जास्तीतजास्त १.५% हप्ता भरावयाचा असतो. वार्षिक व्यापारी आणि फळबाग पिकांसाठी जास्तीतजास्त देय हप्ता ५% असतो.
- कमी हप्ता आणि मोठे संरक्षण: शेतकऱ्यांचा हप्त्याच्या रूपाने असलेला हिस्सा अत्यंत कमी असतो आणि उर्वरित हप्ता सरकारद्वारे भरला जातो. विनिर्दिष्ट पिकांच्या हानीसाठी शेतकऱ्याला संपूर्ण विमा रकमेचे संरक्षण उपलब्ध आहे.
- तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण उपयोग: स्मार्टफोन्सचा उपयोग करून मोबाईल तंत्रज्ञान, सॅटेलाईट डेटाचा उपयोग करून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान, ड्रोन आणि जीपीएस तंत्रज्ञाना हवाई अभ्यास नुकसान भरपाईच्या दाव्यांची पूर्तता करताना होणारा विलंब टाळून पिकांच्या हानीचा अंदाज लवकर घेऊन तो अपलोड करण्यासाठी केला जाईल.
- भारत सरकारचे नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल: शेतकऱ्यांना पीक विमा सेवा उपलब्ध व्हावी तसेच विविध लाभार्थींना अधिसूचित क्षेत्राची आणि अधिसूचित पिकांची माहिती मिळावी म्हणून भारत सरकारने पूर्णत: डिजिटाईझ्ड -https://www.pmfby.gov.in या नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टलची निर्मिती केली आहे.
- कार्यान्वयन एजन्सी (IA): विमा लाभार्थी नोंदणी, जागरुकता निर्माण करणे आणि हंगाम व क्लस्टर (जिल्ह्यांचे संयोजन) साठी सेवा प्रदान करण्याचे दावे केवळ एका विमा कंपनी द्वारे हाताळले जातात.
- अधिक तपशिलांसाठी पीएमएफबीवाय मुख्य पृष्ठाला भेट देण्यासाठी कृपया क्लिक करा.
- योजनेच्या प्रचालनविषयक सुधारित मार्गदर्शक सूचनांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, कृपया लिंक वर क्लिक करा.
- राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या कालमर्यादेत केलेली नावनोंदणीच फक्त विम्यासाठी विचारात घेतली जाईल.
- फक्त राज्य सरकारने अधिसूचित केलेली पिकेच या योजनेंतर्गत अंतर्भूत केली जातात.
- एसएलबीसी/राज्य सरकार यांनी घोषित केलेला अर्थसाह्याच्या आधारेच विमा रकमेची गणना केली जाते.
- विम्याची रक्कम, शेतकऱ्याचा हप्त्याचा हिस्सा जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा आणि विम्याच्या हप्त्याची गणना सिलेक्ट करा.
हंगाम | पिके | शेतकऱ्यांद्वारे देय असलेला हप्ता (विमा रकमेची टक्केवारी) * |
---|---|---|
खरीप | सर्व धान्ये आणि तेलबियांची पिके | विमा रकमेच्या २.०% किंवा विमांकन (ॲक्चुरिअल) दर, यापैकी जो कमी असेल तो |
रब्बी | सर्व धान्ये आणि तेलबियांची पिके | विमा रकमेच्या १.५% किंवा विमांकन (ॲक्चुरिअल) दर, यापैकी जो कमी असेल तो |
खरीप आणि रब्बी | वार्षिक व्यापारी/वार्षिक फळबाग पिके | विमा रकमेच्या ५.०% किंवा विमांकन (ॲक्चुरिअल) दर, यापैकी जो कमी असेल तो |
कर्जदार नसलेले शेतकरी खाली दिलेल्या मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने नावनोंदणी करू शकतात:
- कर्जदार नसलेल्या शेतकऱ्यांना राज्यात प्रचलित असलेल्या जमिनीच्या नोंदींसंबंधीची आवश्यक ती कागदपत्रे (रेकॉर्ड्स ऑफ राईट (आरओआर)), जमीनीच्या मालकीचे प्रमाणपत्र (एलपीसी) इत्यादी आणि/किंवा लागू असलेले करारांचे तपशील/इतर अधिसूचित कागदपत्रे/संबंधित राज्याने परवानगी दिलेले पुरावे सादर करणे आवश्यक असते.
- पीकभागीदार (शेअरक्रॉपर्स)/शेतकरी कुळे यांच्या बाबतीत हे संबंधित राज्याने अधिसूचनेत ठरवून द्यायचे आहे.
- पात्र कर्जदार शेतकऱ्यांना दिले जाणारे संरक्षण हे विमा कंपन्यांनी बँकाच्या/वित्तीय संस्थांच्या माध्यमातून दिले जाईल. आवश्यक असलेली कागदपत्रे बँकेकडेच सादर करावयाची आहेत. तुमच्या संबंधित बँकेच्या माध्यमातूनच फक्त नावनोंदणी होते.
- ज्या शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या वित्तीय संस्थांनी अधिसूचित पिकांसाठी अल्पकालीन हंगामी कृषी परिचालनासाठी (एसएओ) कर्जे/किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) देण्यात आलेले असेल (यानंतर ज्यांचा उल्लेख ‘कर्ज घेतलेले शेतकरी’ असा केला गेला आहे) त्यांच्यासह सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.
-
बँककृपया या योजनेत नावनोंदणी करण्यासाठी तुमच्या नजीकच्या बँकेस जाणून घेण्यासाठी क्लिक करा.कर्जदार/बिगर कर्जदार
-
सीएससीकृपया या योजनेत नावनोंदणी करण्यासाठी तुमच्या नजीकचे सामान्य सेवा केंद्र (सीएससी) जाणून घेण्यासाठी क्लिक करा.बिगर कर्जदार
-
थेटकृपया पीएमएफबीवाय संकेतस्थळाला थेट भेट देऊन नावनोंदणी करण्यासाठी क्लिक करा.
बिगर कर्जदार -
भारतीय डाकयोजनेत नावनोंदणी करण्यासाठी कृपया तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.बिगर कर्जदार
-
Q1 विमा म्हणजे काय?
विमा हे एखाद्या व्यक्तीला किंवा व्यवसायाला अनपेक्षितपणे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठीचे एक साधन आहे, जे नसेल तर आर्थिक संकट कोसळू शकते. ही एक अशी प्रक्रिया असते, ज्यात काही लोकांच्या नुकसानाची भरपाई अनेक जणांच्या वर्गणीतून केली जाते.
-
Q2 पीक विमा म्हणजे काय?
पीक विमा हे पिक न येणे / नुकसानीमुळे किंवा शेतकर्यांच्या नियंत्रणाबाहेरच्या सर्व प्रकारच्या अनपेक्षित संकटांनी उद्भवणाऱ्या अनिश्चिततेमुळे होणार्या आर्थिक नुकसानापासून बचाव करण्याचे एक साधन आहे.
-
Q3 पीएमएफबीवाय म्हणजे काय?
प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) ही शेतकऱ्यांना आकस्मिक आणि निसर्गाच्या प्रतिकूल अनियमित वर्तनामुळे निर्माण झालेल्या संकटांपासून संरक्षण पुरविण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे.
-
Q4 विमा रक्कम/संरक्षणाची मर्यादा म्हणजे काय?
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर असलेली विमा रक्कम ही जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने निश्चित केल्यानुसार एकसारखीच आणि अर्थपुरवठ्याच्या प्रमाणाएवढी असेल व ती एसएलसीसीसीआयद्वारे आधीच जाहीर केली जाईल व अधिसूचित केली जाईल.
वैयक्तिक शेतकऱ्यासाठीची विमा रक्कम हे अर्थपुरवठ्याएवढी किंवा नोशनल ॲव्हरेज व्हॅल्यू (नोशनल ॲव्हरेज यील्ड (एनएवाय) x किमान विक्री किंमत (एमएसपी) / फार्म गेट प्राईस) प्रति हेक्टर गुणिले शेतकऱ्याने विम्यासाठी प्रस्तावित केलेले अधिसूचित पिकासाठीचे क्षेत्र, ज्यात लागवडीखालील क्षेत्र हे नेहमीच हेक्टरमध्ये व्यक्त केले जाईल.
अर्थपुरवठ्याच्या प्रमाणाची व्याख्याही राज्य सरकारच्या अधिसूचनेत आणि नॅशनल क्रॉप इनशुरन्स पोर्टलवर देण्यात आलेली आहे.
सिंचित आणि बिगर सिंचित क्षेत्रासाठीची विमा रक्कम वेगवेगळी असू शकते. -
Q5 पीएमएफबीवायविषयीचे अधिक तपशील मला कुठे बघायला मिळतील?
तपशीलवार विमा संरक्षण, अपवाद आणि परिचालन कार्यपद्धती (ऑपरेशनल मोडॅलिटिज्) साठी कृपया भारत सरकारने प्रसृत केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयीच्या परिचालनविषयक मार्गदर्शक सूचना वाचा.
मागील प्रचालनविषयक मार्गदर्शक सूचनांसाठी येथे क्लिक करा. -
Q6 पिकाच्या दाव्याचे मूल्यमापन कसे केले जाते?
पिकाच्या नुकसानाच्या दाव्यांची गणना ह्या समीकरणावर आधारित केली जाईल ((किमान पीक - वास्तविक पीक) / किमान पीक) x विमा रक्कम.
-
Q7 ह्या योजनेंतर्गत हप्त्यांचे दर कसे आकारले जातात?
हंगाम पिके शेतकऱ्यांद्वारे देय असलेला हप्ता (विमा रकमेची टक्केवारी)* खरीप सर्व धान्ये आणि तेलबियांची पिके विमा रकमेच्या २.०% किंवा विमांकन (ॲक्चुरिअल) दर यापैकी जो कमी असेल तो रब्बी सर्व धान्ये आणि तेलबियांची पिके विमा रकमेच्या १.५% किंवा विमांकन (ॲक्चुरिअल) दर यापैकी जो कमी असेल तो खरीप आणि रब्बी वार्षिक व्यापारी/वार्षिक फळबाग पिके विमा रकमेच्या ५.०% किंवा विमांकन (ॲक्चुरिअल) दर यापैकी जो कमी असेल तो -
Q8 शेतकऱ्यांसाठी पेरणीला केलेल्या प्रतिबंधाचे दावे कसे लागू होतात?
राज्य सरकार अधिसूचित विमा युनिट हे प्रतिबंधित पेरणी/लावणीची स्थिती यामुळे बाधित झालेले क्षेत्र म्हणून जाहीर करील.
हवामानविषयक माहिती, उपग्रहचित्रण आणि पिकाची स्थिती व पेरणी केलेल्या क्षेत्राची माहिती इत्यादींविषयीच्या अहवालांचा उपयोग प्रातिनिधिक निदर्शक म्हणून केला जाईल.
ह्या संरक्षणांतर्गत प्रदान करण्यात आलेला दावा विमा रकमेच्या २५% असेल आणि विमा संरक्षण खंडित करण्यात येईल. -
Q9 सर्व पिके ह्या योजनेंतर्गत अंतर्भूत केली जातात का?
फक्त अधिसूचित पिकेच या योजनेत अंतर्भूत केली जातील.
-
Q10 पीएमएफबीवाय अंतर्गत संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्याची पात्रता काय असावी लागते?
पीकभागीदार (शेअरक्रॉपर्स) आणि शेतकरी कुळे यांच्यासह अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी ह्या संरक्षणासाठी पात्र आहेत.
शेतकर्यांना अधिसूचित / विमा उतरवलेल्या पिकांसाठी विमायोग्य व्याज असले पाहिजे. -
Q11 पीएमएफबीवायमध्ये नावनोंदणीसाठी काही कालमर्यादा आहे का?
पीएमएफबीयमध्ये नावनोंदणी करण्यासाठी अंतिम तारखांचे काटेकोरपणे पालन केले जाते. अंतिम तारखेपूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावांनाच ह्या पॉलिसीअंतर्गत अंतर्भूत केले जाते.
-
Q12 एका शेतकऱ्यासाठी वैयक्तिक विमा रकमेची मर्यादा किती आहे?
विमा रक्कम = अधिसूचित पिकासाठीचे अर्थपुरवठ्याचे प्रमाण x विम्यासाठी प्रस्तावित केलेले अधिसूचित पिकाचे क्षेत्र.
-
Q13 कर्जदार शेतकऱ्याकडून प्रस्ताव आणि हप्ता गोळा करण्याची प्रक्रिया काय आहे?
शेतकऱ्यांनी त्यांचे तपशील संबंधित बँकेकडे सादर करावयाचे असतात.
अंतिम तारखेपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यातून बँकेद्वारे हप्त्याची रक्कम आपोआप वजा केली जाईल -
Q14 बिगर कर्जदार शेतकऱ्याकडून प्रस्ताव आणि हप्ता गोळा करण्याची प्रक्रिया काय आहे?
बिगर कर्जदार शेतकरी नावनोंदणीसाठी कोणतीही बँक, सीएससी यांच्याशी किंवा पीएमएफबीवाय संकेतस्थळावर संपर्क साधू शकतील.
त्यांनी राज्यात प्रचलित असलेल्या जमिनीच्या नोंदींसंबंधीची आवश्यक ती कागदपत्रे (रेकॉर्ड्स ऑफ राईट (आरओआर)), जमीनीच्या मालकीचे प्रमाणपत्र (एलपीसी) इत्यादी आणि/किंवा लागू असलेले करारांचे तपशील/इतर अधिसूचित कागदपत्रे/संबंधित राज्याने परवानगी दिलेले पुरावे सादर करणे आवश्यक असते.
पीकभागीदार (शेअरक्रॉपर्स)/शेतकरी कुळे यांच्या बाबतीत हे संबंधित राज्याने अधिसूचनेत ठरवून द्यायचे आहे.
कागदपत्रांचे सादरीकरण आणि हप्त्याचा भरणा ह्या दोन्हीही बाबी अंतिम तारखेपूर्वी पूर्ण झाल्याच पाहिजेत.